केवळ प्रयोग म्हणून…

आज उपवास मी केला
केवळ प्रयोग म्हणून करून पाहिला
 
“उपवास म्हणजे देवाच्या बाजुला बसाव,
पोटाला पिळून मनातील इच्छारूपी  तेल गाळाव
 
डोळे बंद करून , श्वास मोजत होतो मी,
अंगावर येणारा प्रत्येक स्पर्ष अनुभवत होतो मी.
 
ह्रुदयाचे ठोके मस्ताकाला जागे करायचे,
पोटाची कळ मनाला बावरे करायचे.
 
आज ठरवुनच होतो मी,
काही झाल तरी उठायच नाही
प्राण जायची वेळ 
आली तरी पळायच नाही
 
कोरड्या तोंडी , उपाशी पोटी
स्तब्ध राहिलो मी,
एका डोळ्याने हळूच
देवाला रडतांना पाहिल मी….!
 
थोड्याच वेळात लख्ख प्रकाश पडला
अंगावर माझ्या स्वप्नाचा साक्ष्यात पाउस पडला
प्रेमाने जवळ घेत देव म्हणाला
“नाही रे मला बघवत ही व्यथा
 मलासुद्धा नाही आवडत उपवासाची ही प्रथा”
 
आज उपवास मी केला,
खरच, 
केवळ प्रयोग म्हणूनच करून पाहिला…..!!!
   
                              —डॉ.कल्पेश पाटील.